Shivsena : शिवसेनेच्या धनुष्यबाणसाठी निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला वेळ देण्यास नकार
Shivsena : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला चार आठवड्यांचा वेळ देण्यास नकार दिला.. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरेंना केवळ 15 दिवसांची मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलीय.. शिंदे गटानं आयोगाकडे धाव घेतल्यानं धनुष्यबाण कुणाचा हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला... या संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यावर निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे गटाला पूर्ण वेळ द्यायला नकार दिलाय.. ठाकरे गटाला उत्तरासाठी अवघ्या पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलीय..निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला २३ ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडावंच लागणार आहे...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv