Eknath Shinde vs Uddhav Thackeray : धनुष्यबाणाचा लढा, शिंदे ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप
Eknath Shinde vs Uddhav Thackeray : धनुष्यबाणाचा लढा, शिंदे ठाकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप
शिवसेनेतून फुटलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत, केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि मूळ पक्षाच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असं आवाहन शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत हे आव्हान केलं. शिवसेनेतून फुटलेले १६ आमदार कोर्टात अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.