एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचा फेव्हिकॉलचा जोड किती मजबूत?

"आमच्या युतीत मिठाचा खडा एक वर्षापूर्वी टाकला होता,तो आम्ही फेकून दिला. माझी आणि देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) दोस्ती आताची नाही. ते आमदार आणि मी आमदार होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. हा फेव्हिकॉलचा जोड आहे, कितीही प्रयत्न केले तरी दोस्ती तुटणार नाही, असं  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पालघरमध्ये आज शासन आपल्या दारी ही योजनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी 

 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे'  या शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजप-शिवसेनेत धुसफूस सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज या कार्यक्रमाला हजेरी लावणार की नाही याची उत्सुकता होती. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून पालघरच्या दिशेने रवाना झाले. जाहिरात वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते.  

दोघेही एकाच मंचावर एकत्र आले असले तरी हेलिपॅडवरुन दोघेही वेगवेगळ्या गाडीने कार्यक्रमस्थळी पोहोचले. मग मंचावर आल्यावर पहिली 9 मिनिटं ते दोघे एकमेकांशी काहीच बोलले नाहीत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola