Shinde Delhi Visit | शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ, राऊतांचा मोठा दावा!

गेल्या काही दिवसांपासून शिंदेंचे मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना, एकनाथ शिंदेंच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू आहे. या गुपचूप दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. राजनाथ सिंह यांच्यासोबतच्या भेटीचा फोटोही समोर आला आहे. या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि संजय राऊत यांनी दावे केले आहेत. रोहित पवारांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या काही नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आयकर विभागाच्या नोटिसा येत आहेत, पण अजित पवारांच्या नेत्यांना नोटिसा येत नाहीत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यासाठीच शिंदेंनी दिल्ली वारी केली असावी, असा त्यांचा अंदाज आहे. तर, संजय राऊत यांनी दावा केला आहे की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्ष भाजपमध्ये विलीन करायला तयार आहेत. राऊतांच्या माहितीनुसार, "फिर शिंदे जी, क्या आपके मन में क्या है? तेव्हा शिंदे जी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेवी खायल्ल पोहोचला. त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे." राऊतांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने दिल्ली दौऱ्याचे आणि इतर नेत्यांना भेटल्याचेही सांगितले. तसेच, एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांच्या दाव्यांना फटकारले आहे. मुख्यमंत्री व्हायला कुवत आणि धमक लागते, नुसते बोलून काही होत नाही, असे सामंत म्हणाले. गेली तीन वर्षे एकनाथ शिंदे यांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे, त्यातीलच हा एक भाग असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola