Eknath Shinde Majha Vision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिजन काय? माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन

Continues below advertisement

Majha Maharashtra Majha Vision 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात आपलं व्हिजन मांडलं.उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील कुणाला मिस करताय, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाणांकडे बघून हसले आणि म्हणाले, सांगू का?? सगळंच काही सांगायचं नसतं,असं ते म्हणाले. अशोक चव्हाण इकडे आहेत. ते चांगले आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदही भोगलेलं आहे. त्यांचं वैयक्तिक मी बोलत नाही. त्यावेळी आपल्या कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे हे त्यांनी पाहिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणताच, एकच हशा पिकला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram