Eknath Khadse | शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंची भेट घेणार | ABP Majha

राज्याच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण, भाजपचे नाराज असलेले नेते एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा आता सुरु झालीय. आपली नाराजी दिल्ली दरबारी मांडायला गेलेले खडसे थेट पवारांच्या ६ जनपथवर गेले. तिथं पवार आणि खडसे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. भाजप नेत्यांनी खडसेंना भेटण्यासाठी वेळ न दिल्यानं खडसे मुंबईकडे रवाना झाले. महत्वाची बाब म्हणजे आज खडसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही भेटीसाठी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एका सिंचन प्रकल्पाचं कारण पुढं केलंय. पण भाजपमध्ये सातत्याने अपमान होत राहिल्यास वेगळा विचार करेल, असं म्हणणारे खडसे आता शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आणि त्याच पार्श्वभूमीवर या भेटी होत असल्याचं बोललं जातंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola