Girish Mahajan : जळगाव दूध संघाची निवडणूक एकनाथ खडसेंनी विजय मिळवून दाखवावा : गिरीश महाजन
Continues below advertisement
यंदा जळगाव दूध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. कारण एकनाथ खडसे यांची पत्नी मंदा खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात होणारी लढत. महत्त्वाचं म्हणजे, भाजपचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे रक्षा खडसेंना मंगेश चव्हाण यांचा प्रचार करावा लागतोय. मंदा खडसे यांच्याविरोधात म्हणजेच सासूविरोधात त्यांना प्रचार करावा लागतोय. याच निवडणुकीत एकनाथ खडसेंनी विजय मिळवून दाखवावा, असं थेट आव्हान गिरीश महाजन यांनी दिलंय. तर एकनाथ खडसेंनीही गिरीश महाजनांना चांगलाच टोला लगावलाय
Continues below advertisement