Sudhir Mungantiwar On ND Studio : आरक्षणामुळे स्टुडिओच्या जागी केवळ स्टुडिओच उभारता येईल
एनडी स्टुडिओची जागा कोणी बिल्डरने ताब्यात घेऊ नये म्हणून त्या जागेवर स्टुडिओचं आरक्षण टाकलं असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मुनगंटीवार यांनी आज पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारल्या. सरकार खासगी कर्जदारांशी कधीच वाटाघाटी करत नाही असं मुनगंटीवार म्हणाले. आरक्षणामुळे स्टुडिओच्या जागी केवळ स्टुडिओच उभारता येईल, इतर काही उभारता येणार नाही तसंच त्या जागेवर मराठी चित्रपट आणि सिरियल्सचं शूटिंग करता येईल असं ते म्हणाले.