Dr Shrikant Shinde On Yuti : छोट्या-मोठ्या गोष्टी होत असतात, युतीत कोणताही वितृष्ट येणार नाही
Continues below advertisement
कल्याण पूर्वेत लोकग्राम पादचारी पुलाचे भूमिपूजन डॉ. खा श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. मात्र डोंबिवलीतील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असल्याचं दिसून आलं. कारण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार,जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे कार्यक्रमाला गैरहजर होते. याबद्दल श्रीकांत शिंदेंना विचारलं असता त्यांनी माध्यमांवरच खापर फोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही सगळे एकत्रच आहोत, आमच्यात कुठलाही वाद नाही, असं म्हणत श्राकांत शिंदेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement