BJP मंत्र्यांच्या खात्यात दुप्पट निधी, भाजपकडील खात्यांना 11 हजार 800 कोटी : ABP Majha
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपची छाप सरकारवर वारंवार दिसून आली.... खातेवाटपात तरी अधिक ठळकपणे दिसून आली... आणि आता निधीवाटपातही शिंदे मुख्यमंत्री असले तरीही भाजपचाच वरचष्मा असल्याचं काही प्रमाणात दिसून आलं... आज सादर झालेल्या पुरवण्या मागण्यांच्या तरतुदीत सर्वाधिक निधी हा भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना मिळालाय... भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना ११ हजार ८०० कोटी तर शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या विभागांना ६ हजार २७३ कोटींचा निधी मिळालाय....