Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटलांचं राज ठाकरेंना उद्देशून वक्तव्य?
मशिदीवरचे भोंगे उतरवले नाहीत तर स्पीकर लावून हनुमान चालीसा चालवेन असा इशारा राज ठाकरेंनी दिला. आणि आता त्याचे राजकीय पडसाद उमटू लागलेत. राज ठाकरेंचं वक्तव्य प्रक्षोभक आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारं होतं का हे राज्य सरकारकडून तपासलं जाणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. त्यामुळं राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाईबाबत चाचपणी केली जातेय का असा प्रश्न आता चर्चिला जातोय.