Devendra Fadnavis Pune : देवेंद्र फडणवीसांना पुणे लोकसभेची उमेदवारी द्या, ब्राम्हण महासंघाची मागणी

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डांकडे करण्यात आलीय. फडणवीस यांची भाजपच्या संसदीय समितीवर नुकतीच निवड करण्यात आलीय. त्यामुळे लोकसभेत जाण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ फडणवीसांसाठी सुरक्षित असल्याचं  ब्राम्हण महासंघाचं म्हणणं आहे. तर 2019च्या विधानसभेत कोथरुड मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे फडणवीसांना लोकसभेची उमेदवारी देऊन, ही भरपाई करण्यात यावी, असंही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram