Devendra Fadnavis on Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल

राष्ट्रवादीबाबतचा कुठलाही निर्णय हा राष्ट्रवादी पक्षच घेईल.. राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत..  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यासोबत २ वेळा चर्चा केली.. मात्र, जो अंतिम निर्णय असेल तो राष्ट्रवादी पक्ष घेईल, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलीये.. 

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत...  उद्या संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे... त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील... या शपथविधीपूर्वी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल.. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलंय...  दरम्यान आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी सुनेत्रा पवार बारामतीतून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola