Devendra Fadnavis On Sharad Pawar : 'पवारांना माहित आहे, त्यांची लोकं बाहेर का पडली?'- फडणवीस

राष्ट्रवादीच्या फुटीबद्दल इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना शरद पवारांनी अजित पवार गटासह भाजपवर गंभीर आरोप केले.. ईडीच्या भीतीने सर्वजण भाजपसोबत गेल्याचं विधान शरद पवारांनी केलंय.. त्याला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांवर पलटवार केला.. २०१९ला शरद पवार आमच्यासोबत म्हणजेच भाजपसोबत येण्यास तयार होते असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय.. तर तेव्हा कुठल्या यंत्रणांना घाबरुन पवारांनी आमच्याशी चर्चा केली? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola