देशमुखांना पाठीशी घालण्याचा पवारांचा प्रयत्न फसला,मुख्यमंत्र्यांकडूनही अनेक गोष्टींवर पांघरूण:फडणवीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Mar 2021 12:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेले दावे खोडून काढले. देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्रे सादर करत अनिल देशमुख खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांना काल चुकीची माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. अनिल देशमुखांचा पाठिशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.