शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली, देशमुख खासगी विमानानं मुंबईत आले होते - देवेंद्र फडणवीस

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेले दावे खोडून काढले. देवेंद्र फडणवीस यांनी काही कागदपत्रे सादर करत अनिल देशमुख खासगी विमानाने नागपूरहून मुंबईला आले होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांना काल चुकीची माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. अनिल देशमुखांचा पाठिशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न फसला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola