Eknath Shinde Meet Praful Patel : प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी अजितदादा, शिंदे, फडणवीसांची बैठक

Eknath Shinde Meet Praful Patel : प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी अजितदादा, शिंदे, फडणवीसांची बैठक होत आहे. महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत खलबतं सुरू आहे. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. 

 लोकसभा निवडणुकांच्या निकालात महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या (Mahayuti) जागा मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 43 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीला यंदा केवळ 17 जागांवरच विजय मिळाला आहे. त्यापैकी, भापला 9 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली. त्यामुळे, महायुतीच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात तणावाचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. मात्र, आमच्या मित्र पक्षातील समन्वयावर एकत्र बसून चर्चा करू, निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषदेतून म्हटले होते. त्यानंतर, आता राजधानी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक होत असून बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असल्याची माहिती आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola