Maharashtra Politics :महाराष्ट्रात नव्या युतीचे संकेत, फडणवीस, शिंदे, राज ठाकरे एका मंचावर

Maharashtra Politics : मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान महाराष्ट्रातल्या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचं साक्षीदार आहे. शिवाजी पार्क मैदानानं महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची निर्मिती आणि राजकीय युतीही पाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर नव्या महायुतीची पहाट होण्याचे संकेत आज शिवतीर्थावर पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. निमित्त होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनाचं. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निर्माण झालेली जवळीक महाराष्ट्रानं गेल्या काही महिन्यांमध्ये अनुभवली आहे. शिवसेनेतलं बंड आणि राज्यातल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातही सलोख्याचं वातावरण निर्माण झालं आहे. पण मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीस हे तीन नेते
पहिल्यांदाच एकत्र आले 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola