Delhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होता

Continues below advertisement

Anil Desai Shiv Sena Uddhav Thackeray Group Maharashtra News  
दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का  ... दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा आम आदमी पक्षाला पाठिंबा  ,.... दिल्ली विधानसभेसाठी तिरंगी लढत ....   
दरम्यान यासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाईं आणि काँग्रेस नेते
पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यानी काय प्रतिक्रिया दिलीये..   

Delhi Assembly Election: लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात सामना करण्यासाठी तयार झालेली इंडिया आघाडी दिल्ली निवडणुकीत बिघडताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिल्लीतील निवडणुकीत केजरीवालांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये मतविभाजन होणार नाही, अशी अपेक्षा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी 'एबीपी'शी संवाद साधताना  व्यक्त केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण महाराष्ट्र निवडणुकीत आम आदमी पक्षाने आमचा पाठिंबा दिला होता.असे त्यांनी सांगितले. 

दिल्लीतील एकूण 70 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे निवडणुक आयोगाने सांगितले आहे. यावेळी दिल्लीत आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. दरम्यान, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोठे पाऊल उचचले आहे. पक्षाने अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला आपला पाठिंबा जाहीर केलाय. या निर्णयामुळे काँग्रेसला धक्का बसल्याचं समजलं जात आहे. या निर्णयामुळं काँग्रेस आणि आम आदमी पक्षात मतविभागणी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दिल्लीत मतांची विभागणी होणार नाही आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपच्या विरोधात निवडणूक लढवतील, अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केली. 



 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram