DCM Ajit Pawar Full PC : अजित पवारांकडून जय पवारांच्या उमेदवारीवर मोठं भाष्य : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App''अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी माझा कारखाना विकला' माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी गोप्यस्फोट केला आहे. भाजपमधून 10 वर्षांनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात आल्यानंतर त्यांना आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सूर्यकांता पाटील ॲक्टीव मोडवर आल्या असून त्यांनी उपमुख्यमंंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विश्रामगृहात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत सूर्यकांता पाटील हजर होत्या. स्वगृही परतलेल्या नेत्यांचा यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सत्कार करण्यात आला. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाला माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री डॉ माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आमदार प्रदीप नाईक, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भगवान आलेगावकर शहराध्यक्ष डॉ सुनील कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.