Court Hearing on Hijab Case : हिजाबचा फैसला आता मोठ्या खंडपीठाकडे : ABP Majha
हिजाबचा फैसला आता मोठ्या खंडपीठाकडे जाणार आहे. कर्नाटक सरकारच्या हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठात मतमतांतरे झाली. एका न्यायमूर्तींनी कर्नाटक सरकारचा हिजाबबंदीचा निर्णय योग्य ठरवला, तर दुसऱ्या न्यायमूर्तींनी हिजाब बंदीचा निर्णय अयोग्य ठरवला. या मतमतांतरामुळे हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येणार असून मोठं खंडपीठ त्यावर निर्णय देणार आहे.