Maharashtra Congress पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात काँग्रेसचं सोमवारी आंदोलन

Continues below advertisement
मुंबई : पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे मात्र आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसूली करत आहे, असा आरोप महाराष्ट्र कॉंग्रेसनं केला आहे. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

कॉंग्रेसच्या वतीने राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉंग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात सहभागी होऊन चीन सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आरोप केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram