
Sunil Kedar Viral Video : माझ्या वाट्याला गेलात तर, घराघरात घुसून हाल करेन केदारांचा इशारा
Continues below advertisement
"सत्ताधाऱ्यांनो तुमच्या अधिकाऱ्यांना सांगून द्या, पुढच्या वेळेला सुनील केदारवर वार कराल तर त्याला थेट फाशी द्या... असाच सोडाल, तर सुनील केदार तुमच्या घराघरात जाऊन तुमचे हाल करेल.." या शब्दात सुनील केदार यांनी महायुतीच्या नेत्यांना घरात घुसून धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीची छोटेखानी सभा झाली. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सुनील केदारांनी सत्ताधाऱ्यांना धमकावत पुढच्या वेळेला माझ्या वाट्याला गेलात तर घराघरात घुसून हाल करेन अशी धमकीच दिली.
Continues below advertisement