Ashok Chavan Full PC : मला राजकीयदृष्ट्या संपवण्याच प्रयत्न, अशोक चव्हाणांची खळबळजनक आरोप
Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच माझा विनायक मेटे करण्याचा डाव असल्याचं वक्तव्य त्यांनी नांदेडमधील कारेगावात आयोजित सत्कार समारंभात केलंय. मंत्रीपदाच्या काळातील लेटर हेडचा गैरवापर करून अज्ञाताने बनावट पत्रे तयार केली असल्याची तक्रार अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढंच नव्हे तर घातपात घडवण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केल्यानं राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं आहे.अशोक चव्हाण म्हणाले, माझ्या लेटरपॅडचा दुरूयोग होतो आहे, याची माहिती मला मिळाली. लेटरपॅडचा वापर करून अनेकवेळा वेगेगळ्या विषयांबाबत आपण पत्र देत असतो. अशावेळी बनावट पत्राच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी घडू शकतात. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यावर फक्त माझी सही आहे बाकी काहीचं नाही. कुणीतरी गैरवापर करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी मागणी होती. परंतु कुणीतरी चुकीचा वापर करत आहे.