Congress NCP I ठरलं! राज्यात महाशिवआघाडीचंच सरकार येणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची माहिती I एबीपी माझा
Continues below advertisement
राज्यातील सत्तास्थापनेचे केंद्र आता दिल्ली झाले आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास 3 तासांहून जास्त ही बैठक सुरु आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर, राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार येईल, असे नवाब मलिक म्हणाले.
Continues below advertisement