Coastal Road: मुख्यमंत्री पुढच्या सीटवर, दोन उपमुख्यमंत्री मागे; व्हिंटेजमधून कोस्टल रोडची पाहणी!

Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पातील दक्षिण मुंबईला (South Mumbai) उत्तर मुंबईशी (North Mumbai) जोडणारा मरीन ड्राइव्ह (Marine Drive) ते वरळी (Worli) दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिंटेज कारद्वारे कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर, तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार मागच्या सीटवर बसलेले होते. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटांत करता येणार आहे.
 
हे देखील वाचा
 

Anna Bansode: शिंदे गटाची एका राज्यमंत्रीपदावर बोळवण, अजित पवारांना काहीच नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याने मनातील खदखद बाहेर काढली

पिंपरी-चिंचवड: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) पंतप्रधानांचा आणि मंत्र्यांचा शपथविधी रविवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी एकूण 72 खासदारांना मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील केवळ सहा मंत्र्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मोठी राजकीय जोखीम पत्कारुन भाजपसोबत आलेल्या अजित पवार  गटाला एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. अजित पवार गटाचा (Ajit Pawar Camp) एकच खासदार असल्याने त्यांना फक्त राज्यमंत्रीपद देण्याची तयारी भाजपने दाखवली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने कालच्या शपथविधी सोहळ्यात फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली होती. या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात प्रचंड नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी या नाराजीला मोकळी वाट करुन दिली आहे. ते सोमवारी पिंपरीत 'एबीपी माझा'शी बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram