Aarey I ठाकरे सरकारकडून आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश I एबीपी माझा
आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
Tags :
Aarey Agitation News Aarey News Withdraw Cases Of Aarey Agitation Uddhav Thackeray Decision मराठी बातम्या