CM Eknath Shinde यांच्या हत्येच्या कटाची खोटी माहिती , अविनाश वाघमारेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हत्येच्या कटाची खोटी माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अविनाश वाघमारे असं या व्यक्तीचं नाव आहे... हॉटेलचं बिल द्यायचं नव्हतं म्हणुन हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाश वाघमारे मुख्यमंत्र्यांच्या हत्येची चर्चा चालली असल्याचा बनाव रचला.... एकनाथ शिंदेंवर आत्मघातकी हल्ल्याचा कट असल्याचं त्यानं सांगितलं... चार जण कट रचत असल्याचं त्यानं पोलिसांना फोन केला होता.. मात्र पोलिसांच्या तपासात ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झालं... त्यामुळे अविनाश वाघमारेनं ही नसती उठाठेव केल्याने गृहविभागासह पोलीस प्रशासनाचीही झोप उडाली होती...