CM Eknath Shinde on Ration Scheme : आनंदाचा शिधा offline देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

आनंदाचा शिधा ऑफलाईन द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एबीपी माझाच्या बातमीची आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक ठिकाणी शिधा वाटपात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा तात्काळ ऑफलाईन देण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.    राज्यात ज्या जिल्ह्यात हा आनंदाचा शिधा पोहोचला आहे, तिथे नागरिकांना एक वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना आनंदाचा शिधा मिळण्यास उशीर होत आहे. यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफलाईन शिधा वाटपाचे आदेश दिले आहेत.    

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola