CM Eknath Shinde - Devendra Fadnavis उतावीळ मंत्र्यावर नाराज? सत्तांरांना सुनावल्याची चर्चा

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले. यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे सतत सदासरवण प्रकरणामुळेही मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola