CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री अयोध्या दौरा करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार
Continues below advertisement
CM Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 9 एप्रिल रोजी अयोध्या दौरा करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. आपल्या अयोध्या दौऱ्यावेळी (Ayodhya Visit) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
Continues below advertisement