CM Eknath Shinde यांची आज औरंगाबादच्या पैठणमध्ये सभा, सभेला गालबोट लावण्यासाठी क्लिपचं षडयंत्र
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज औरंगाबादच्या पैठणमध्ये सभा होतेय. मंत्री संदीपान भुमरे या सभेच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोललं जातंय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होतोय. हे आरोप होत असताना एक ऑडिओ क्लिप समोर आलीय. यांत तीनशे रुपये देऊन महिलांची गर्दी करण्याबाबतचा संवाद ऐकायला मिळतोय.. एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही... शिंदे समर्थक आमदार संदीपान भुमरे यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ते मतदारसंघात परतले.. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळेच याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय...
Continues below advertisement