Chitra Wagh On Sanjay Rathod : राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी : चित्रा वाघ
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChitra Wagh On Sanjay Rathod : पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेले वर्षभर चोहीकडून होणारे आरोप, ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागलीय... राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर नाराजी व्यक्त केलीय. राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तसंच राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार असून ही लढाई जिंकणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदावर उघड नाराजी व्यक्त केलीय..राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राठोड यांना पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी क्लिनचीट मिळाली आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपदाचीही संधी दिलीय... मात्र यावरुन आता वादाची शक्यता आहे..