Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांसह नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री शिंदे अयोध्येत जाणार आहेत. याआधी त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंबरोबर अयोध्येचा दौरा केला होता. आता शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिंदे प्रथमच अयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.