CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी केली. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शिंदेंना प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.. मरीन ड्राईव्ह ते वरळी असा कोस्टल रोडचा पहिला टप्पा आहे. वरळीला हा कोस्टल रोड सी-लिंकला जोडण्यात येणार आहे.. यामध्ये मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा टप्पा भुयारी असणार आहे.. दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्यांची यामुळे मोठी सोय होणार आहे.