Chhagan Bhujbal On MVA : 'मविआत सगळेच भाऊ, मोठा, लहान कोण? हे कशावरुन ठरवायचं? : छगन भुजबळ
मविआमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलं होतं.. मात्र छगन भुजबळ यांनी यासंदर्भात थोडी वेगळी प्रतिक्रिया दिलीेय.. महाविकास आघाडीमध्ये सगळेच भाऊ आहेत. मोठा कोण आणि लहान भाऊ कोण? हे कशावरुन ठरवायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.