Chhagan Bhujbal :राज्यात पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळं दाढीला चांगले दिवस आले

 राज्य विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी गाजवला. खरं तर भुजबळांची आक्रमकता, त्यांची शेरोशायरी आणि त्यांची प्रतिस्पर्ध्यांना चिमचे काढणारी शैली सभागृहाला काही नवी नाही. शिवसेनेचे वाघ असण्याच्या जमान्यात भुजबळांनी एकट्यानं विधानसभा गाजवलीय. त्यावेळी भुजबळ ऐन उमेदीत होते. पण आज राजकीय अनुभवानं रापलेल्या भुजबळांनी आज सत्ताधाऱ्यांना उद्देशून अशी काही टोलेबाजी केली, की सत्ताधारी आणि विरोधकही हास्यकल्लोळात बुडून गेले.राज्यात पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळं दाढीला चांगले दिवस आले असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कोटी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola