Chhagan Bhujbal Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांसह इतर आरोपींना नोटीस

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष सुटका झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे याच प्रकरणी पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छगन भुजबळांसह निर्दोषमुक्त केलेल्या इतर आरोपींना हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली असून चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मनी लाँड्रींग प्रकरणातून निर्दोष सोडल्याविरोधात अंजली दमानिया यांनी हायकोर्टात धाव घेत दाद मागितली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram