Chhagan Bhujbal on Sharad Pawar : मी वन मॅन आर्मी शरद पवारांच्या मुलाखतीवर भुजबळांची प्रतिक्रिया
1995 मध्ये पवारांनी मला विरोधी पक्षनेता केलं, तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. मी वन मॅन आर्मी म्हणून काम केलं होतं. पवारांना काँग्रेसमधून बाहेर काढलं तेव्हा पवारांसोबत न जाता काँग्रेसमध्ये रहावं. काँग्रेसकडून मुख्यमंत्री करू असं काँग्रेस नेते यांनी सांगितलं होतं
मुकुल वासनीक व इतर काँग्रेस नेत्यांना विचारलं तर ते सांगतील, मात्र मी पवारांसोबत राहणार सांगितलं. 2004 मध्ये पक्ष का फुटला याची कल्पना मला नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
हे व्हिडिओ देखील पाहा
J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय