Chandrashekhar Bawankule : आदित्य ठाकरेंनी खोटारडेपणा केलाय, बावनकुळे यांचा 'मविआ'वर निशाणा
Chandrashekhar Bawankule : सर्व केंद्रीय मंत्र्यांवर लोकसभा निवडणुकीची दबाबदारी सोपवणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिली. बावनकुळे यांनी दिल्लीत आज राज्यातील केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या मंत्र्यांबरोबरच नारायण राणे आणि भारती पवार यांच्यावरही निवडणुकीची जबाबदारी दिली जाईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयात नसल्यामुळे उद्योग बाहेर गेले असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय