Chandrashekhar Bawankule BJP Meeting : चंद्रशेखर बावनकुळे घेणार मुंबई भाजपची बैठक : ABP Majha
Continues below advertisement
आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज भाजपच्या वतीने मुंबई विभागाची बैठक बोलावण्यात आली आहे. दादर येथील भाजप मुंबई कार्यालयात ही बैठक बोलावण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. सर्वसामान्य मतदारांपर्यंत कशा पध्दतीनं पोहचायचं, तसंच आतापर्यंत देण्यात आलेले कार्यक्रम पूर्ण केले का, याचा आढावा बावनकुळे घेणार आहेत.
Continues below advertisement