Chandrasekhar Bawankule:माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात Devendra Fadnavisमुख्यमंत्री व्हावेत

Continues below advertisement

Chandrasekhar Bawankule on Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. न्यायासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे. जो जो समाज त्यांच्याकडे गेला. त्याच्यासाठी त्यांनी काम केलं आहे. मराठा असतील, धनगर असतील, ओबीसी असतील, सर्वांसाठी त्यांनी काम केलं. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे असे स्पष्ट वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले. माझ्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्री झाले पाहिजे असेही त्यांनी म्हटले. बावनकुळे यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram