Chandrakant Patil on Divyang University : दिव्यांग विद्यापीठासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश
Chandrakant Patil on Divyang University : दिव्यांग विद्यापीठासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश
राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. अमरावती जिल्ह्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. राज्यात स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याचा निर्णय शासनानं याआधीच घेतला आहे. आता दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ होणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून, या विद्यापीठाच्या कामाला गती यावी यासाठी समिती स्थापन करण्यात येईल.अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Tags :
CHandrakant Patil