Disha Salian Death Case : दिशा सालियनचा मृत्यू हा घातपात नव्हे तर अपघातच, सीबीआयचा अहवाल

Disha Salian Death Case : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची मॅनेजर असलेल्या दिशा सालियानच्या मृत्यूबाबत अनेक वावड्या उठल्या मात्र दिशा सालियनचा मृत्यू हा घातपात नव्हे तर अपघातच होता असा अहवाल सीबीआयनं दिलाय. मालाडमधील राहत्या घराच्या बाल्कनीतून पडून दिशाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर पाच दिवसात सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी सापडला होता... मात्र या दोन्ही मृत्यूंचा परस्पर संबंध असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला होता... त्याबाबत तपास करताना सीबीआयनं हा निष्कर्ष काढलाय. दारूच्या नशेत असलेली दिशा सालियन तोल जाऊन इमारतीतून पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला असा अहवाल सीबीआयनं दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola