Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू | ABP Majha

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झालाय. त्यात ४ जणांचा मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी झालेत. साताऱ्याहून वरात आटोपून परतणाऱ्या कारनं टँकरला मागून धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. चालकाचं झोपेवर नियंत्रण न झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. तरी, अपघातात मृत्यू झालेल्या सदस्यांची नावं कळू शकलेली नाहीत. पण शुभकार्य आटोपून परततानं काळानं घाला घातल्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येतेय. अपघातातील दोन गंभीर जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola