Jalgaon मधील कुसुंबा खुर्द आणि कुसुंबा बुद्रुक या दोन्ही गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा
Continues below advertisement
तर जळगावच्या रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द आणि कुसुंबा बुद्रुक या दोन्ही गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. या दोन गावांना जोडणारा पूल अठरा वर्षांपूर्वी वाहून गेला होता. मात्र अजूनही नवा पूल बांधलेला नाही. त्यामुळे तातडीने पूल बांधून न दिल्यास मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दोन्ही गावातील ग्रामस्थांनी दिली. या संदर्भात ग्रामपंचायतीत एकमताने ठराव देखील परित केला आहे. पूल नसल्याने दोन्ही गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे नाईलाज म्हणून मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं
Continues below advertisement