BJP in Vidhansabha | ग्रामपंचायत विधेयकावरून विधानसभेत रणकंदन, भाजपचा सभात्याग, जोरदार घोषणाबाजी
Continues below advertisement
आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच अधिवेशनासाठी हजर राहता येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. परंतु, अनेकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल न मिळाल्याने त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे विधानभवन परिसरात कर्मचारी आणि नेत्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेकांना विधानभवन परिसरात प्रवेश मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Monsoon Session 2020 Fadnavis Maharashtra State Assembly Maharashtra Monsoon Session CM Uddhav Thackeray Speech Rainy Session Monsoon Session Vidhan Parishad Vidhan Sabha Uddhav Thackeray Maharashtra Government BJP Ajit Pawar Maha Vikas Aghadi Coronavirus Covid 19