BJP Vs Shivsena | कोकणात शिवसेनेचं 'वस्त्रहरण' करणार; भाजपचा निर्धार, तर शिवसेना म्हणते..

भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने येणाऱ्या काही दिवसांत होणाऱ्या नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूरसह पाच महापालिका निवडणुका आणि 14 हजार 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणनीती ठरवली जाणार आहे. यासंदर्भाच आज भाजपची पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका, त्यात असलेले स्थानिक नेतृत्त्वाचे विषय आणि विजयाचं गणित मांडण्यासाठीचा रोडमॅपचा रिव्ह्यू आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं. तसेच या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करत सरकारवर टीकेची झोडही उठवली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola