Nagpur BJP Protest : नागपुरात भाजपकडून बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानचा निषेध

बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात नागपुरात भाजपने बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानचा निषेध करत तीव्र आंदोलन केले.. सीताबर्डी परिसरातील व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळा समोर हे आंदोलन करण्यात आले... यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली... पाकिस्तानातील बिलावल भुट्टो असो किंवा भारतातील काही राजकीय पक्ष, यांची भाषा एक सारखी असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आला... काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा निषेधही या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी केला 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola