Navneet Rana Amravati : नवनीत राणांच्या विजयासाठी अमरावतीत भाजपाचा मेगा प्लॅन : ABP Majha
Continues below advertisement
नवनीत राणांच्या विजयासाठी अमरावती भाजपाने मेगा प्लॅन आखला आहे. अमरावती भाजपाचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा देखील हजर होत्या. यावेळी भाजप नेत्यांनी एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहायला नको, सगळ्यांनी नवनीत राणांच्या विजयासाठी २६ दिवस-रात्र मेहनत करावी तसंच ४ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करताना जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि लोक हजर राहतील याचं नियोजन करण्यात आलंय.
Continues below advertisement